आढावा
WHO नुसार, प्रजननक्षम वयातील सुमारे 6 पैकी 1 व्यक्तीला आयुष्यात कधीतरी वंध्यत्वाचा सामना करावा लागतो त्यामुळे या समस्येतून तुम्ही एकटे जात नाही आहात, हे लक्षात ठेवा. नियमित प्रयत्न करूनही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ गर्भधारणा न होणे म्हणजे वंध्यत्व. यामागे शुक्राणूंची समस्या, फॅलोपियन ट्यूब्समध्ये अडथळा, हार्मोन्समधील असंतुलन, PCOS, लठ्ठपणा, मधुमेह किंवा थायरॉइडच्या समस्या अशी अनेक कारणे असू शकतात. मात्र, आज वंध्यत्वासाठी अनेक प्रभावी तपासण्या आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढवण्यास मदत होऊ शकते.
नियमितपणे आणि गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध ठेवूनही 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ गर्भधारणा न होणे म्हणजे वंध्यत्व. ही समस्या पुरुषांमध्ये, महिलांमध्ये किंवा दोघांमध्येही असू शकते. काही वेळा वंध्यत्वाचे नेमके कारणही समजू शकत नाही. मात्र, Infertility meaning in Marathi म्हणजे कधीच गर्भधारणा होऊ शकत नाही असा अर्थ नाही. योग्य वेळी तपासणी करून कारण शोधले आणि योग्य उपचार घेतले, तर अनेक प्रकरणांमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवता येते. काही परिस्थितींमध्ये वंध्यत्व पूर्णपणे दूर करता येत नसले तरी उपलब्ध उपचारांमुळे गर्भधारणेसाठी मदत मिळू शकते.
वंध्यत्वाचे मुख्यतः दोन प्रकार मानले जातात
ज्या जोडप्याला यापूर्वी कधीही गर्भधारणा झालेली नाही आणि नियमितपणे गर्भनिरोधक न वापरता प्रयत्न करूनही 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ गर्भधारणा होत नाही, त्याला प्राथमिक वंध्यत्व म्हणतात. यामागचे कारण पुरुषाशी, महिलेशी किंवा दोघांशी संबंधित असू शकते.
यापूर्वी गर्भधारणा झाल्यानंतर पुन्हा गर्भधारणा होण्यात अडचण येत असेल, तर त्याला सेकंडरी वंध्यत्व म्हणतात. दुय्यम वंध्यत्वामध्ये यापूर्वीची प्रसूती वंध्यत्वावरील औषधे किंवा ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (IVF) सारख्या उपचारांची मदत न घेता झालेली असणे आवश्यक असते. त्यामुळे आधी मूल झाले असले तरी पुढील गर्भधारणेत अडचण येत असल्यास त्याला दुय्यम वंध्यत्व म्हणता येते.
नियमित वंध्यत्वाच्या तपासण्या केल्यानंतरही गर्भधारणा न होण्यामागचे ठोस कारण सापडत नसेल, तर त्याला अस्पष्ट वंध्यत्व म्हणतात. याचा अर्थ वंध्यत्वामागे कोणतेही कारण नाही असा होत नाही. सध्याच्या तपासण्यांमधून त्याचे कारण समजू शकलेले नाही, असा त्याचा अर्थ आहे. अनाकलनीय वंध्यत्वाचे निदान झाले म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता संपली असे नाही. योग्य उपचार आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने अशा जोडप्यांना गर्भधारणा होण्यास मदत होऊ शकते. NIH यांच्या माहितीनुसार, उपचार घेतलेल्या अस्पष्ट वंध्यत्व असलेल्या 92% जोडप्यांना पुढे मूल होण्यास यश मिळते.
Infertility meaning in Marathi चे सर्वांना जाणवतील असे ठराविक लक्षण नसते. नियमितपणे आणि गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध ठेवूनही गर्भधारणा न होणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. मात्र, वंध्यत्वामागे हार्मोन्स किंवा प्रजनन अवयवांशी संबंधित काही समस्या असतील, तर त्यांची काही लक्षणे दिसू शकतात.
ही लक्षणे विशेषतः हार्मोन्समधील बदल, PCOS किंवा इतर प्रजननाशी संबंधित समस्यांमुळे दिसू शकतात.
वंध्यत्वाचे कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे असू शकते. काही कारणे फक्त महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये आढळतात, तर काही कारणे दोघांच्याही प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात. काही वेळा एकापेक्षा जास्त कारणेही एकत्र असू शकतात.
महिलांमध्ये वंध्यत्वाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे अंडोत्सर्गात अडचण, म्हणजे अंडाशयातून नियमितपणे अंडे बाहेर न पडणे. याशिवाय ही कारणेही असू शकतात:
पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमुख कारण शुक्राणूंशी संबंधित समस्या असतात. शुक्राणूंची संख्या, हालचाल किंवा रचना यामध्ये समस्या असल्यास गर्भधारणेत अडचण येऊ शकते.
काही कारणे पुरुष आणि महिलांमध्ये दोघांनाही लागू होतात आणि प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात:
वंध्यत्वाची समस्या असल्यास पुरुष आणि महिला दोघांनीही तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे, कारण कारण पुरुषाशी, महिलेशी किंवा दोघांशीही संबंधित असू शकते.
डॉक्टर तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या आरोग्याची एकूण माहिती घेतील, ज्यामध्ये पाळीची माहिती, यापूर्वीची गर्भधारणा किंवा गर्भपात, लैंगिक जीवन, आधीचे आजार किंवा शस्त्रक्रिया, कुटुंबातील विविध आजारांचा इतिहास, घेत असलेली औषधे व सप्लिमेंट्स आणि धूम्रपान किंवा मद्यपानाच्या सवयी यांचा समावेश असू शकतो. तुम्हाला जाणवणारी कोणतीही लक्षणे किंवा समस्या डॉक्टरांना मोकळेपणाने सांगा आणि कोणतीही माहिती लपवू नका. यामुळे डॉक्टरांना योग्य तपासण्या निवडून वंध्यत्वामागचे कारण शोधण्यास आणि त्यानुसार उपचार ठरवण्यास मदत होते.
तुमच्या आरोग्याची आणि वैद्यकीय इतिहासाची माहिती घेतल्यानंतर डॉक्टर वंध्यत्वामागचे कारण शोधण्यासाठी काही आवश्यक तपासण्या सुचवू शकतात. यामध्ये रक्ताच्या चाचण्या, शारीरिक तपासणी, अल्ट्रासाऊंड आणि इतर आवश्यक चाचण्यांचा समावेश असू शकतो. शक्य असल्यास दोन्ही पार्टनर्सनी तपासणी करून घेणे चांगले, कारण वंध्यत्वाचे कारण पुरुषाशी, महिलेशी किंवा दोघांशीही संबंधित असू शकते. त्यामुळे योग्य कारण शोधणे आणि पुढील उपचार ठरवणे सोपे जाते.
वंध्यत्वाचा उपचार त्यामागचे कारण आणि तुमचे उद्दिष्ट यावर मुख्यतः अवलंबून असतो. तुमचे वय, किती काळापासून गर्भधारणेचा प्रयत्न करत आहात, तपासण्यांचे निकाल, आरोग्याची स्थिती आणि तुमच्या पसंतीनुसार उपचार ठरवला जातो. काही वेळा फक्त एका पार्टनरला उपचारांची गरज असते, तर काही वेळा दोघांनाही उपचार घ्यावे लागू शकतात. उपचारामध्ये जीवनशैलीत बदल, औषधे, शस्त्रक्रिया, अंडोत्सर्गासाठी औषधे, IUI किंवा IVF यांचा समावेश असू शकतो. कोणता उपचार करायचा आणि त्याची गरज किती आहे हे वंध्यत्वाच्या कारणानुसार डॉक्टर ठरवतात.
वंध्यत्वाचे वैद्यकीय निदान करताना पुरुष आणि महिला दोघांचीही शारीरिक तपासणी, हार्मोन्सच्या रक्ताच्या चाचण्या आणि गरजेनुसार विशेष इमेजिंग तपासण्या केल्या जाऊ शकतात.
गरजेनुसार खालील चाचण्या केल्या जाऊ शकतात:
पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कारण शोधण्यासाठी गरजेनुसार खालील तपासण्या केल्या जाऊ शकतात:
वंध्यत्वाचा उपचार त्यामागचे कारण, वय, आरोग्याची स्थिती आणि दोन्ही पार्टनर्सच्या तपासणीच्या निकालांनुसार ठरवला जातो.
ज्या महिलांची पाळी अनियमित असते किंवा अंडोत्सर्ग होत नाही, त्यांना डॉक्टर गोळ्या किंवा गरजेनुसार हार्मोनची इंजेक्शन्स देऊन अंडोत्सर्ग सुरू किंवा नियमित करण्याचा प्रयत्न करू शकतात. ही औषधे अंडाशयातील अंड्यांची वाढ होण्यास आणि अंडे बाहेर पडण्यास मदत करतात. काही उपचारांमध्ये एकापेक्षा जास्त अंडी तयार होण्यासाठी अंडाशयाला उत्तेजित केले जाते. याला कंट्रोल्ड ओव्हेरियन स्टिम्युलेशन (COS) म्हणतात.
IUI मध्ये डॉक्टर बारीक नळीच्या मदतीने तयार केलेले शुक्राणू थेट गर्भाशयात सोडतात. यामुळे शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते. IUI ला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेही म्हटले जाते.
IVF मध्ये अंडी आणि शुक्राणूंचे शरीराच्या बाहेर लॅबमध्ये फलन केले जाते. फलन झाल्यानंतर तयार झालेला निरोगी भ्रूण गर्भाशयात ठेवला जातो. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी 1-2 भ्रूण ठेवले जातात.
मूल होणे हे अनेक जोडप्यांचे स्वप्न असते आणि वंध्यत्व हे त्या स्वप्नासमोर एक आव्हान ठरू शकते. याचा परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही, तर मानसिक आरोग्य आणि नात्यावरही होऊ शकतो. प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल, तर निराश होण्याऐवजी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही समस्या एकट्याने झेलण्यापेक्षा पार्टनरसह तपासणी आणि उपचार घेणे नेहमीच चांगले. वंध्यत्वाची शक्यता कमी ठेवण्यासाठी धूम्रपान, तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणे, मद्यपान टाळणे किंवा कमी करणे, नियमित व्यायाम करणे, पौष्टिक आहार घेणे आणि निरोगी जीवनशैली ठेवणे फायदेशीर ठरू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, योग्य वेळी योग्य मदत घेतल्यास वंध्यत्वाच्या अनेक कारणांवर उपचार करता येतात.