IVF साठी अंडे काढण्याची प्रक्रिया वेदनादायक असते का? काय अपेक्षित असते आणि रिकव्हरी टिप्स

Last updated: March 25, 2026

आढावा

एग रिट्रिव्हल, म्हणजेच अंडे काढण्याची प्रक्रिया, ही IVF मधील एक महत्त्वाची पायरी आहे. या प्रक्रियेत परिपक्व अंडी काढून ती प्रयोगशाळेत फलित केली जातात. IVF मध्ये ही पायरी खूप महत्त्वाची असली तरी अनेक महिलांना अंडे काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान वेदना होतील का किंवा त्रास होईल का याची चिंता वाटत असते. कोणत्याही महत्त्वाच्या वैद्यकीय प्रक्रियेप्रमाणे याबाबतही अनेक प्रश्न आणि शंका मनात येऊ शकतात.

हा लेख त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि अंडे काढण्याच्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात काय अपेक्षित असते याची माहिती देण्यासाठी लिहिला आहे. या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती मिळाल्यास चिंता कमी होण्यास आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते.

परिचय

एग रिट्रिव्हल (अंडे काढण्याची प्रक्रिया) ही IVF प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे आणि पालक होण्याच्या प्रवासात तिची मोठी भूमिका असते. या प्रक्रियेत अंडाशयातून परिपक्व अंडी काढून ती प्रयोगशाळेत फलित करण्यासाठी वापरली जातात.

परंतु दुसऱ्या बाजूला अनेक महिलांच्या मनात काही प्रश्नही असतात: IVF मधील अंडे काढण्याची प्रक्रिया किती वेदनादायक असते? किती त्रास होऊ शकतो?

या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती असल्यास भीती आणि चिंता कमी होते आणि IVF उपचार अधिक सुलभ आणि आत्मविश्वासाने पार पाडता येतात. या ब्लॉगमध्ये अंडे काढण्याची प्रक्रिया दरम्यान नेमके काय होते, किती वेदना किंवा साइड इफेक्ट्स होऊ शकतात आणि रिकव्हरी कशी व्यवस्थित हाताळावी याबद्दल स्पष्ट आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे.

एग रिट्रिव्हल म्हणजे काय?

IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) हा अनेक टप्प्यांमध्ये होणारा प्रजनन उपचार आहे. त्यापैकी एक महत्त्वाची पायरी म्हणजे एग रिट्रिव्हल (अंडे काढण्याची प्रक्रिया). या टप्प्यात महिलेच्या अंडाशयातून परिपक्व अंडी काढली जातात, जेणेकरून त्यांचे प्रयोगशाळेत फलन करता येईल.

साधारणपणे अंडाशयाला उत्तेजना देणाऱ्या उपचारांनंतर काही दिवसांनी ही प्रक्रिया केली जाते. या काळात महिलेला हार्मोन इंजेक्शन्स दिली जातात, ज्यामुळे एकापेक्षा जास्त अंडी तयार होण्यास मदत होते.

अंडी पूर्णपणे परिपक्व झाल्यावर डॉक्टर एग रिट्रिव्हल प्रक्रिया ठरवतात. ही प्रक्रिया सामान्यतः क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये केली जाते. अंडी काढल्यानंतर त्यांना पुरुषाच्या शुक्राणूंशी प्रयोगशाळेत एकत्र करून भ्रूण (एम्ब्रियो) तयार केला जातो. त्यानंतर हा भ्रूण पुढील टप्प्यात महिलेच्या गर्भाशयात ठेवला जातो.

IVF मध्ये अंडे काढण्याची प्रक्रिया वेदनादायक असते का?

बहुतेक महिलांच्या मते अंडे काढण्याची प्रक्रिया वेदनादायक नसून थोडी अस्वस्थता जाणवणारी असते. कारण या प्रक्रियेच्या वेळी साधारणपणे सेडेशन किंवा अ‍ॅनेस्थेसिया दिले जाते. त्यामुळे प्रक्रिया सुरू असताना महिला पूर्णपणे जाग्या नसतात आणि अंडाशयातून अंडी काढण्यासाठी वापरली जाणारी सुई त्यांना जाणवत नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक-दोन दिवस हलके पोटदुखी, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पेल्विक भागात थोडी अस्वस्थता जाणवू शकते. ही लक्षणे साधारणपणे पाळीच्या वेदनांसारखी असतात आणि काही दिवसांत कमी होतात.

अस्वस्थतेची पातळी प्रत्येक महिलेनुसार वेगळी असू शकते. ती वेदनांची सहनशक्ती, शरीराची औषधांना होणारी प्रतिक्रिया आणि किती अंडी काढली गेली आहेत यावर अवलंबून असते.

हेही वाचा: वयानुसार आणि भ्रूणांच्या संख्येनुसार IVF यशाचे प्रमाण.

अंडे काढण्याच्या प्रक्रियेनंतर काय अपेक्षित असते?

अ‍ॅनेस्थेसियामुळे ही प्रक्रिया तुलनेने सोपी वाटते. तरीही रिकव्हरीच्या काळात काही हलके साइड इफेक्ट्स दिसू शकतात. हे पूर्णपणे सामान्य असतात आणि साधारणपणे काही दिवसांत कमी होतात.

1. हलकी पोटदुखी किंवा पोटात कळा येणे

  • अंडाशय उत्तेजनानंतर पुन्हा त्यांच्या नैसर्गिक आकारात येताना असे होऊ शकते.
  • ही वेदना साधारणपणे पाळीच्या वेदनांसारखी किंवा खालच्या पोटात हलकी अस्वस्थता वाटू शकते.
  • सहसा एक ते दोन दिवसांत ही समस्या कमी होते.

2. पोट फुगल्यासारखे वाटणे

  • अंडाशय थोडे मोठे होणे आणि शरीरात द्रव साचल्यामुळे ही समस्या दिसू शकते.
  • त्यामुळे पोटात जडपणा किंवा ताण जाणवू शकतो.
  • भरपूर पाणी पिणे यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.

3. हलके रक्तस्राव किंवा योनीतून स्त्राव

  • थोडासा रक्तस्राव किंवा गुलाबी रंगाचा स्त्राव दिसणे सामान्य आहे.
  • अंडी काढताना वापरलेल्या सुईमुळे योनीच्या भिंतीवर हलकी जखम झाल्यामुळे असे होऊ शकते.
  • सहसा एक-दोन दिवसांत हे आपोआप थांबते.

हे साइड इफेक्ट्स दिसणे सामान्य आहे आणि योग्य काळजी घेतल्यास ते सहज नियंत्रित करता येतात. मात्र काही लक्षणे सामान्य नसता, त्यामुळे कोणती लक्षणे लक्षात घ्यावीत हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: IVF मध्ये चांगले परिणाम मिळण्यासाठी किमान किती अंडी आवश्यक असतात?

अंडे काढण्याच्या प्रक्रियेनंतर वेदना कमी करण्यासाठी टिप्स

IVF मध्ये अंडे काढण्याच्या प्रक्रियेनंतर काही काळ हलकी अस्वस्थता किंवा वेदना जाणवू शकतात. त्या कमी करण्यासाठी आणि रिकव्हरी जलद होण्यासाठी खालील सोप्या गोष्टी मदत करू शकतात:

  • हीटिंग पॅड वापरा: खालच्या पोटावर हीटिंग पॅड ठेवले तर कळा कमी होण्यास आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र हीटिंग पॅड थेट त्वचेवर ठेवू नका. आधी टॉवेलमध्ये गुंडाळूनच वापरा.
  • पुरेशी विश्रांती घ्या: प्रक्रियेनंतर किमान 24 तास शरीराला आराम द्या. जास्त धावपळ, कष्टाची कामे किंवा जड वस्तू उचलणे टाळा.
  • पुरेसे पाणी प्या आणि हलका आहार घ्या: शरीराला लवकर बरे होण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि हलका व पौष्टिक आहार घ्या.
  • डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या: डॉक्टरांनी हलके वेदनाशामक औषध दिले असल्यास ते त्यांच्या सल्ल्यानुसारच घ्या. स्वतःहून औषधे घेणे टाळा.

अंडे काढण्याच्या प्रक्रियेनंतर योग्य काळजी घेतल्यास शरीर लवकर सावरायला मदत होते.

डॉक्टरांना कधी संपर्क करावा?

अंडे काढण्याच्या प्रक्रियेनंतर थोडी वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे सामान्य असते. मात्र खालील लक्षणे दिसल्यास तुमच्या फर्टिलिटी तज्ज्ञांशी संपर्क करणे आवश्यक आहे:

  • तीव्र वेदना किंवा जास्त रक्तस्राव: हलकी कळ येणे सामान्य असते. पण वेदना खूप वाढत असल्यास किंवा जास्त रक्तस्राव होत असल्यास ते गंभीर समस्या दर्शवू शकते. अशा वेळी डॉक्टरांशी लगेच बोलावे.
  • ताप किंवा संसर्गाची लक्षणे: ताप येणे, थंडी वाजणे, चक्कर येणे किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव दिसणे ही संसर्गाची चिन्हे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • लघवी करताना अडचण किंवा खूप पोट फुगणे: लघवी करताना त्रास होणे किंवा पोट खूप फुगल्यासारखे वाटणे हे ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम (OHSS) चे लक्षण असू शकते. ही समस्या दुर्लक्षित करू नये.

वेळीच वैद्यकीय मदत घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते. काही शंका असल्यास नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निष्कर्ष

थोडक्यात सांगायचे तर, IVF मध्ये अंडे काढण्याची प्रक्रिया वेदनादायक असते का? सामान्यतः ही प्रक्रिया खूप वेदनादायक मानली जात नाही. कारण प्रक्रियेच्या वेळी क्लिनिकमध्ये सेडेशन किंवा अ‍ॅनेस्थेसिया दिले जाते. त्यामुळे प्रक्रिया चालू असताना वेदना जाणवत नाहीत.

प्रक्रियेनंतर काही काळ हलकी कळ, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा थोडी अस्वस्थता जाणवू शकते. मात्र हा त्रास साधारणपणे कमी असतो आणि लवकरच कमी होतो. बहुतांश महिला एक-दोन दिवसांत पुन्हा त्यांच्या नेहमीच्या कामांमध्ये परतू शकतात. IVF क्लिनिकही संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तुम्हाला शक्य तितके आरामदायी वाटावे याची काळजी घेतात.

Indira IVF येथे उपचार घेताना तुमच्या अनुभवाच्या प्रत्येक बाबीची काळजी घेतली जाते. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि सहाय्यक टीम यांच्या मदतीने तुमचा फर्टिलिटी उपचाराचा प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

अंडे काढण्याची प्रक्रिया किती वेळ चालते?

अंडे काढताना मी जागी असेन का?

PCOS असलेल्या महिलांसाठी ही प्रक्रिया जास्त वेदनादायक असते का?

अंडे काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामावर जाता येते का?

IVF प्रक्रियेतील मुख्य टप्पे कोणते असतात?

रोबोटिक ट्यूबल लिगेशन सर्जरी पारंपरिक रिव्हर्सल सर्जरीपेक्षा चांगली असते का?

PGT सर्व IVF रुग्णांसाठी आवश्यक असते का?

IVF मध्ये लेझर हॅचिंग कधी वापरले जाते?

IVF उपचारापूर्वी लॅप्रोस्कोपी आवश्यक असते का?

अस्वीकरण: येथे दिलेली माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. योग्य तपासणी आणि वैयक्तिक उपचारासाठी प्रमाणित प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
IVF साठी अंडे काढण्याची प्रक्रिया वेदनादायक असते का? काय अपेक्षित असते आणि रिकव्हरी टिप्स
© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer