कधी “एएमएच पातळी” हा शब्द ऐकला आहे आणि तिची वाढ घट तुमच्या अंडाशयातील अंड्यांच्या साठ्यावर कसा परिणाम करते हे विचार केले आहे का? अँटी-म्युल्लेरियन हार्मोन म्हणजेच एएमएच हा असा प्रोटीन प्रकार आहे, ज्यावरून एका स्त्रीच्या अंडाशयात किती अंडी शिल्लक आहेत याचा अंदाज करता येतो. म्हणजेच अंड्यांची संख्या आणि एएमएच पातळी यांचा थेट संबंध असतो एएमएच कमी असेल, तर अंड्यांची संख्या कमी असण्याची शक्यता जास्त असते. कमी एएमएच म्हणजे नेहमीच वंध्यत्व असे नसते, पण गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होऊ शकते. म्हणूनच विशेषतः गर्भधारणा करण्याचा विचार करणाऱ्या महिलांसाठी एएमएचची पातळी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर चला, आता कमी एएमएचची लक्षणे, कारणे, योग्य पातळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचारांचे पर्याय समजून घेऊया.
अँटी-म्युल्लेरियन हार्मोन हा अंडाशयातील फॉलिकल्स (अपरिपक्व अंड्यांच्या भोवती असलेल्या पेशी) तयार करतात आणि याच्याद्वारे अंडाशयात उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे याची कल्पना मिळते. म्हणूनच AMH लेव्हल्सचा थेट संबंध ओव्हेरियन रिझर्वशी असतो. कमी एएमएच म्हणजे अंड्यांचा साठा कमी झाला आहे, पण याचा अर्थ असा नाही की नेहमीच प्रजननक्षमता बिघडलेली आहे. लक्षात ठेवा कमी एएमएच म्हणजे अंड्यांची संख्या कमी; पण याचा अर्थ असा नाही की अंड्यांची गुणवत्ता नक्कीच खराब आहे किंवा तुम्ही पूर्णपणे वंध्य आहात. कमी एएमएच असलेल्या अनेक महिलांना नैसर्गिकरीत्या किंवा एडवांस्ड इनफर्टिलिटी उपचारांच्या मदतीने गर्भधारणा होऊ शकते. एएमएच आणि त्याचा परिणाम समजून घेतल्याने पुढील काळातील गर्भधारणा नियोजन अधिक व्यवस्थित करता येते.
अँटी-म्युल्लेरियन हार्मोनबद्दल लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे:
कमी एएमएचची पातळी नेहमी थेट दिसणारी शारीरिक लक्षणे देत नाही, पण शरीरात काही ठराविक बदल किंवा पॅटर्न दिसू शकतात. लक्षात ठेवण्यासारखी काही सामान्य लक्षणे/संकेत असे
कमी एएमएचची कारणे शरीररचना, आनुवंशिकता आणि जीवनशैली या सगळ्यांशी संबंधित असू शकतात. काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे
जर या पैकी काही कारणे तुमच्यावर लागू होत आहेत असे वाटत असेल, किंवा तुम्ही गर्भधारणेबाबत विचार करत असाल, तर स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञाकडे जाऊन एएमएच चाचणी व इतर तपासण्या करून घेणे उपयोगी ठरेल. यामुळे पुढील योजना (नैसर्गिक गर्भधारणा की उपचार) व्यवस्थित ठरवता येते.
अँटी-म्युल्लेरियन हार्मोन (एएमएच) तपासणी ही एएमएचची पातळी समजून घेण्यासाठी सर्वात विश्वासार्ह पद्धत मानली जाते. ही चाचणी प्रजननक्षमता (fertility) मोजण्यासाठीही उपयोगी आहे, कारण एएमएचची पातळी मासिक चक्रभर साधारण स्थिर राहते; इतर हार्मोन्ससारखी (जसे FSH किंवा इस्ट्रोजेन) फार बदलत नाही.
ही चाचणी इतरांच्या तुलनेत सोपी का मानली जाते?
तुमच्या लक्षणांवरून डॉक्टरांना कमी एएमएचची शंका आली, तर ते ही चाचणी सुचवतात. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर तुमच्यासाठी योग्य व वैयक्तिक उपचारयोजना आखू शकतात.
कमी एएमएचचे निदान झाले की बहुतेक महिलांच्या मनात दोन प्रश्न येतात : यावर उपचार आहेत का? ही पातळी पुन्हा वाढू शकते का? सध्या एएमएचची पातळी कायमस्वरूपी वाढवणारा ठराविक एकच उपचार उपलब्ध नाही. पण काही वैद्यकीय पद्धती आणि जीवनशैलीतील बदल यांच्या मदतीने यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवता येते. कमी एएमएचसाठी साधारण पुढील पर्याय वापरले जातात:
जसे आधी सांगितले आहे, कमी एएमएचचा रिपोर्ट पाहून मन खचणे स्वाभाविक आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गर्भधारणा करू शकत नाही. काही वैद्यकीय मदतीने आणि अनेक वेळा नैसर्गिकरीत्याही निरोगी गर्भधारणा शक्य असते. कमी एएमएच असलेल्या अनेक महिलांनी यशस्वीरीत्या गर्भधारणा करून निरोगी बाळांना जन्म दिला आहे. मात्र हे सगळे प्रामुख्याने वय, एकूण प्रजनन आरोग्य आणि अंड्यांची गुणवत्ता यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. एडवांस्ड असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह ट्रीटमेंट्स जसे IVF, IUI किंवा ICSI यांनी कमी एएमएच असलेल्या अनेक महिलांना मदत केली आहे
ज्या प्रकरणांत एएमएचची पातळी खूपच कमी असते, तिथे डोनर अंडी हा एक पर्याय ठरू शकतो, तर जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे कमी झालेल्या एएमएचमध्ये साधे बदल – जसे आरोग्यदायी आहार, तणाव कमी करणे, धूम्रपान टाळणे हे खूप फरक घडवू शकतात. कोणताही उपचार मार्ग निवडला तरी, अनेक यशस्वी गर्भधारणांच्या उदाहरणांनी हे सिद्ध केले आहे की कमी एएमएच असतानाही मातृत्व शक्य आहे. फक्त योग्य प्रजनन पर्याय निवडणे आणि योग्य वेळी उपचार सुरू करणे आवश्यक असते.
शेवटी, कमी एएमएचचे निदान होणे अनेक महिलांसाठी मानसिकदृष्ट्या जड जाऊ शकते, विशेषतः जेव्हा प्रजननक्षमतेवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार सुरू असतो. पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कमी एएमएच म्हणजे वंध्यत्व नाही; याचा अर्थ फक्त अंडाशयातील अंड्यांचा साठा कमी झाला आहे. त्यासोबतच अंड्यांची गुणवत्ता, गर्भाशयाचे आरोग्य आणि एकूण जीवनशैली यांसारख्या इतर घटकांचाही विचार करूनच संपूर्ण स्थिती समजून घ्यावी लागते. कमी AMH असतानाही, योग्य मार्गदर्शन आणि फर्टिलिटी ट्रीटमेंट्स- जसे IVF, ICSI किंवा डोनर अंडी, यांच्या मदतीने अनेक महिलांनी यशस्वी गर्भधारणा केली आहे.
जीवनशैलीत केलेले बदल, जसे की संतुलित आहार घेणे, धूम्रपान कमी/सोडणे, तणावाचे व्यवस्थापन, हे प्रजनन आरोग्याला चांगला आधार देऊ शकतात. गरज आहे लवकर तपासणी आणि वेळेत योग्य उपचार सुरू करण्याची, जेणेकरून सर्वोत्तम पर्याय तुमच्यासमोर ठेवता येतील. जर तुमची एएमएच पातळी कमी असल्याचे निदान झाले असेल, तर फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्यासाठी वैयक्तिक योजना तयार करून घेणे हा पुढचा योग्य टप्पा आहे. आजच्या आधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे, आई-वडील होण्याची आशा आणि शक्यता दोन्ही अजूनही पूर्णपणे जिवंत आहेत.
कमी AMH असतानाही नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊ शकते, विशेषतः तुमचे वय कमी असेल आणि अंड्यांची गुणवत्ता चांगली असेल तर. चांगली लाइफस्टाइल, नियमित पाळीचा सायकल आणि योग्य वेळी केलेला संबंध (टाइम्ड इंटरकोर्स) यामुळे यशाची शक्यता वाढू शकते.
एएमएच थेट वाढवण्याचा खात्रीशीर उपाय नाही, पण धूम्रपान टाळणे, चांगला आहार, व्यायाम आणि हार्मोन संतुलन राखल्याने अंडाशयाचे आरोग्य जपता येते.
कमी AMH म्हणजे वंध्यत्व असे नाही. याचा अर्थ फक्त ओव्हेरियन रिझर्व कमी आहे. कमी AMH असतानाही अनेक महिला नैसर्गिकरीत्या किंवा मेडिकल इंटरव्हेन्शन्सच्या मदतीने गर्भवती होतात.
काही प्रकरणांत शक्य असते, पण नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता कमी असते. अशा वेळी प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार आवश्यक असतात.
पौष्टिक आहार, पुरेशी झोप, तणाव कमी करणे, धूम्रपान मद्यपान टाळणे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सप्लिमेंट्स घेणे यामुळे अंड्यांच्या गुणवत्तेला मदत होऊ शकते.
साधारणपणे AMH लेव्हल 1.0 ng/mL पेक्षा कमी असल्यास ते लो मानले जाते. मात्र फर्टिलिटी पोटेन्शियल हे वय आणि इतर मेडिकल कारणांवरही अवलंबून असते. AMH रिपोर्टचे योग्य आणि विश्वासार्ह विश्लेषण फक्त डॉक्टरच करू शकतात.
लो AMH असलेल्या महिलांमध्ये फर्टिलिटी ट्रीटमेंटदरम्यान प्रत्येक सायकलमध्ये कमी अंडी तयार होऊ शकतात. तरीही, एकच हेल्दी आणि योग्य गुणवत्तेचं अंडंही यशस्वी प्रेग्नन्सी देऊ शकते.
AMH लेव्हल थेट वाढवणारे कोणतेही उपाय नाहीत, पण अँटिऑक्सिडंट्स, हिरव्या पालेभाज्या, लीन मीट्स आणि ओमेगा–3 फॅटी ॲसिड्स सारख्या पदार्थांचा समतोल आहार ओव्हेरियन हेल्थ आणि एग क्वालिटी सुधारण्यास मदत करतो.
हो, लॅबमधील तपासणी पद्धती किंवा शरीरातील तात्पुरत्या बदलांमुळे AMH च्या पातळीत थोडाफार चढ-उतार होऊ शकतो. तरीही, स्त्रीबीजांच्या साठ्याचा अंदाज घेण्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा इंडिकेटर मानला जातो