प्रायमरी आणि सेकंडरी इनफर्टिलिटी: कारणे, जोखीम आणि उपाय

Last updated: January 28, 2026

Overview

गर्भधारणा होण्यासाठी वर्षभर नियमित, असुरक्षित संबंध ठेवूनही गर्भ राहात नसेल, तर त्याला वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी म्हटलं जातं. प्रायमरी आणि सेकंडरी इनफर्टिलिटी यातील फरक समजून घेतला, तर स्वतःची परिस्थिती नीट समजून घेण्यात खूप मदत होते. या लेखात आपण दोन्ही प्रकारच्या वंध्यत्वाची काही सामान्य लक्षणे, कारणे आणि उपलब्ध वैद्यकीय उपाय साध्या भाषेत पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुढचा मार्ग समजून घेणं सोपं जाईल.

भूमिका

वंध्यत्व म्हणजे काय? जर एखाद्या जोडप्याने 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ नियमित, असुरक्षित संबंध ठेवले, तरीही गर्भधारणा होत नसेल, तर त्या स्थितीला वंध्यत्व/ इनफर्टिलिटी म्हटलं जातं. ही समस्या फक्त स्त्रीमध्येच नाही, तर पुरुष आणि स्त्री दोघांच्याही कारणांमुळे होऊ शकते. वंध्यत्वाचे दोन प्रमुख प्रकार आहेत प्रायमरी आणि सेकंडरी इनफर्टिलिटी.

  • प्रायमरी इनफर्टिलिटी: जेव्हा एखाद्या जोडप्याला एकदाही गर्भधारणा झालेली नसते आणि सुरुवातीपासूनच गर्भ राहात नाही, तेव्हा त्या स्थितीला प्रायमरी इनफर्टिलिटी म्हटलं जातं.
  • सेकंडरी इनफर्टिलिटी: आधी प्रेग्नन्सी झाली असते, पण नंतर पुन्हा गर्भधारणा होण्यात अडचण येते, तेव्हा त्या स्थितीला सेकंडरी इनफर्टिलिटी म्हणतात.

इनफर्टिलिटी प्रायमरी आहे की सेकंडरी हे समजून घेणं महत्त्वाचं असतं, कारण त्यानुसार तपासण्या आणि उपचार यांची दिशा ठरते. सेकंडरी इनफर्टिलिटीमध्ये अनेकदा “पहिल्यांदा सहज गर्भ राहिला, आता का नाही?” असा गोंधळ आणि नाराजी जास्त जाणवते. तर दुसरीकडे, प्रायमरी वंध्यत्वात सुरुवातीपासून कधीच गर्भ न राहिल्यामुळे आशा-निराशेचे वेगळे भाव निर्माण होतात.

प्रायमरी इनफर्टिलिटी म्हणजे काय?

ज्या दांपत्याला कधीही गर्भधारणा झाली नाही आणि एक वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही, त्या स्थितीला प्रायमरी इनफर्टिलिटी म्हणतात. हे बहुतेक वेळा पहिल्यांदाच बाळाची योजना करणाऱ्या तरुण जोडप्यांमध्ये दिसून येते. काही वेळा प्रायमरी इनफर्टिलिटी आनुवंशिक असू शकते, म्हणजेच आई-वडिलांकडून मुलांकडे ही समस्या जाऊ शकते. अशा वेळी काही विशिष्ट तपासण्या आणि उपचार करावे लागतात.

प्रायमरी इनफर्टिलिटीची मुख्य वैशिष्ट्ये:

  • याआधी एकदाही गर्भधारणा झालेली नसते.
  • लग्नानंतर किंवा नातेसंबंधाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत ही समस्या समोर येते.
  • पुरुष किंवा महिलांमधील प्रजनन, हार्मोनल किंवा शरीररचनेशी संबंधित कारणांमुळे ही अडचण होऊ शकते.

सेकंडरी इनफर्टिलिटी म्हणजे काय?

एका किंवा अधिक वेळा यशस्वी गर्भधारणा (बाळंतपण, गर्भपात किंवा इतर) झाल्यानंतर पुन्हा गर्भधारणा न होणे किंवा गर्भ पूर्ण काळापर्यंत टिकू न देणे, याला सेकंडरी इनफर्टिलिटी म्हणतात. लोकांमध्ये असा समज असतो की आधी एकदा बाळ झालं आहे, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही; म्हणूनच सेकंडरी इनफर्टिलिटी शारीरिकदृष्ट्या जितकं गंभीर असू शकतं, तितकंच मानसिकदृष्ट्याही जास्त त्रासदायक ठरू शकतं, कारण समस्या अनपेक्षितपणे समोर येते.

काही महत्त्वाच्या गोष्टी:

  • काही केसेसमध्ये सेकंडरी इनफर्टिलिटी प्रायमरी इनफर्टिलिटीपेक्षा जास्त दिसू शकते, कारण: अनेक दांपत्ये दुसरे मूल होण्यास उशीर करतात, ज्यामुळे सेकंडरी इनफर्टिलिटीची शक्यता वाढू शकते.
  • हे लग्नाच्या किंवा नातेसंबंधाच्या सुरुवातीच्या काळात ओळखले जाण्याची शक्यता जास्त असते.
  • सेकंडरी इनफर्टिलिटी अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही किंवा ती कमी लेखली जाते.

तुम्ही कोणत्याही प्रकारच्या इनफर्टिलिटीच्या सामना करत असलात, तरी हा प्रवास एकट्याने पार करण्याची गरज नाही. अनुभवी फर्टिलिटी स्पेशालिस्टचा सल्ला घेऊन योग्य मार्गदर्शन, तपासण्या आणि उपचार घेतले, तर या गुंतागुंतीच्या आणि कधी- कधी थकवणाऱ्या प्रक्रियेतून जाणं तुलनेने सोपं आणि आशादायक होऊ शकतं.

महिलांमधील प्रायमरी इनफर्टिलिटीची सामान्य कारणे

महिलांमध्ये प्रायमरी इनफर्टिलिटीची अनेक कारणे असू शकतात, पण बहुतेक कारणे गायनॅकॉलॉजिक समस्यांशी संबंधित असतात. सर्वात सामान्य कारणे खालीलप्रमाणे:

  • ओव्ह्युलेशन डिसऑर्डर्स: PCOS (पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) ओव्ह्युलेशनमध्ये अडथळा आणतो आणि मासिक पाळीचा सायकल अनियमित करतो.
  • फॉलोपियन ट्यूब ब्लॉकेज: ट्यूबरक्युलोसिस (TB) किंवा इतर इन्फेक्शन्समुळे फॉलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज तयार होऊ शकते, ज्यामुळे अंडाणू आणि स्पर्म भेटू शकत नाहीत, आणि गर्भधारणा होत नाही.
  • हार्मोनल इम्बॅलन्स: हार्मोन्समध्ये बिघाड झाल्यास पाळीची वेळ बदलते आणि ओव्ह्युलेशन योग्य पद्धतीने होत नाही.
  • गर्भाशयातील समस्या: जन्मजात समस्या जसे युटेरिन सेप्टम, फायब्रॉइड्स, यामुळे भ्रूणाचे इम्प्लान्टेशन होऊ शकत नाही
  • अंड्यांची क्वालिटी कमी होणे किंवा अंड्यांची क्षमता कमी होणे: याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे वाढते वय. वय वाढल्यावर अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी होते, विशेषतः 35 वर्षांनंतर, ज्यामुळे गर्भधारणा अधिक कठीण होते आणि गुंतागुंत वाढण्याची शक्यता वाढते.

पुरुषांमधील प्रायमरी इनफर्टिलिटीची सामान्य कारणे

पुरुषांमध्ये प्रायमरी इनफर्टिलिटीची मुख्य कारणे म्हणजे लो स्पर्म काउंट, असामान्य स्पर्म, कमी स्पर्म मोर्टिलिटी, किंवा स्पर्म नसणे.

  • लो स्पर्म काउंट किंवा मोर्टिलिटी कमी असणे: स्पर्मची संख्या कमी असणे किंवा स्पर्मची हालचाल (motility) कमजोर असणे यामुळे अंड्यापर्यंत पोहोचणे कठीण होते आणि फर्टिलायझेशन होऊ शकत नाही.
  • हार्मोनल समस्या: हार्मोन्समध्ये बिघाड झाल्यास स्पर्म प्रॉडक्शन कमी होते, स्पर्म काउंट आणि मोर्टिलिटीवरही परिणाम होतो.
  • व्हरिकोसील किंवा ब्लॉकेज: स्क्रोटममधील रक्तवाहिन्या मोठ्या होणे (varicocele) किंवा वास डिफरेन्समध्ये ब्लॉकेज असणे यामुळे स्पर्म बाहेर पडत नाही. यामुळे फर्टिलिटीवर गंभीर परिणाम होतो.
  • वास डिफरेन्स ब्लॉकेज: टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होत असला तरी ब्लॉकेजमुळे बाहेर येत नाही, आणि सिमेन अ‍ॅनालिसिसमध्ये शून्य स्पर्म काउंट दिसू शकतो.

पुरुषांमधील प्रायमरी इनफर्टिलिटीची सामान्य कारणे

पुरुषांमध्ये प्रायमरी इनफर्टिलिटीची मुख्य कारणे म्हणजे लो स्पर्म काउंट, असामान्य स्पर्म, कमी स्पर्म मोर्टिलिटी, किंवा स्पर्म नसणे.

  • लो स्पर्म काउंट किंवा मोर्टिलिटी कमी असणे: स्पर्मची संख्या कमी असणे किंवा स्पर्मची हालचाल (motility) कमजोर असणे यामुळे अंड्यापर्यंत पोहोचणे कठीण होते आणि फर्टिलायझेशन होऊ शकत नाही.
  • हार्मोनल समस्या: हार्मोन्समध्ये बिघाड झाल्यास स्पर्म प्रॉडक्शन कमी होते, स्पर्म काउंट आणि मोर्टिलिटीवरही परिणाम होतो.
  • व्हरिकोसील किंवा ब्लॉकेज: स्क्रोटममधील रक्तवाहिन्या मोठ्या होणे (varicocele) किंवा वास डिफरेन्समध्ये ब्लॉकेज असणे यामुळे स्पर्म बाहेर पडत नाही. यामुळे फर्टिलिटीवर गंभीर परिणाम होतो.
  • वास डिफरेन्स ब्लॉकेज: टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होत असला तरी ब्लॉकेजमुळे बाहेर येत नाही, आणि सिमेन अ‍ॅनालिसिसमध्ये शून्य स्पर्म काउंट दिसू शकतो.

सेकंडरी इनफर्टिलिटीची सामान्य कारणे

ज्या जोडप्यांना आधी एकदा नैसर्गिकरीत्या गर्भधारणा झाली आहे, त्यांना नंतर अचानक सेकंडरी इनफर्टिलिटी असल्याचं कळणं खूपच मनस्तापदायक ठरू शकतं. पहिल्यांदा सहज गर्भ राहिल्यानंतर पुढच्या वेळी गर्भधारणा न होणं, अनेक नवीन किंवा बदललेल्या कारणांमुळे होऊ शकतं. ही कारणे पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणामध्याही दिसू शकतात आणि गर्भधारणेच्या आधी किंवा नंतरही विकसित होऊ शकतात.

स्त्रियांमध्ये

  • वय वाढल्यामुळे फलनक्षमता कमी होणे : वय वाढल्यावर, विशेषतः 35 वर्षांनंतर, अंडाणूंची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊ लागतात. त्यामुळे दुसऱ्या किंवा पुढील गर्भधारणेची शक्यता घटते.
  • हार्मोनल असंतुलन : थायरॉइडच्या समस्या, प्रोलॅक्टिन वाढलेलं असणं, इन्सुलिन रेझिस्टन्स इत्यादींमुळे ओव्ह्युलेशन (अंडोत्सर्ग) थांबू शकतो किंवा अनियमित होतो.
  • स्कार टिश्यू किंवा चिटक्यां (adhesions) ची निर्मिती : आधीच्या बाळंतपणात आलेल्या गुंतागुंती, सिझेरियन डिलिव्हरी, किंवा D&C सारख्या प्रक्रियांमुळे गर्भाशयात स्कार टिश्यू तयार होऊ शकतो किंवा फॅलोपीयन ट्युब्सवर परिणाम होऊ शकतो. यामुळे अंडाणू व शुक्राणूची भेट होण्यात अडथळा येऊ शकतो.
  • वजन वाढणे किंवा स्थूलता : पहिल्या गर्भधारणेनंतर खूप वजन वाढणं किंवा अचानक वजन घटणं यामुळे हार्मोन्स बिघडू शकतात आणि पाळी तसेच ओव्ह्युलेशनचा सायकल बदलू शकतो.
  • आरोग्याच्या इतर वैद्यकीय समस्या : आधी त्रास न देणारे आजार जसे एंडोमेट्रिओसिस, PCOS (Polycystic Ovarian Syndrome) इ. नंतर जास्त स्पष्ट होऊ शकतात आणि फलनक्षमतेवर परिणाम करू शकतात.

पुरुषांमध्ये

  • लाइफस्टाईलमध्ये झालेले बदल : वाढलेला ताण, चुकीचा आहार, मद्यपान, धूम्रपान, झोपेचा अभाव आणि सतत बसून राहण्याची सवय यामुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊ शकतात.
  • वयानुसार झालेले बदल : वयानुसार शुक्राणूंची संख्या आणि हालचाल कमी होऊ शकते, ज्याचा सरळ परिणाम फलन प्रक्रियेवर होतो.
  • नवीन आरोग्यसमस्या : गेल्या गर्भधारणेनंतर डायबिटीज, हायपरटेन्शन, किंवा हार्मोनल समस्या तयार झाल्या असतील तर त्या स्पर्म प्रॉडक्शनवर परिणाम करू शकतात आणि फर्टिलिटी कमी होऊ शकते.
  • पर्यावरणातील हानिकारक घटकांचा संपर्क : कामाच्या स्वरूपात किंवा छंदांमध्ये बदल झाल्यामुळे केमिकल्स, जास्त उष्णता किंवा रेडिएशनचा संपर्क आल्यास त्याचा पुरुषांच्या फर्टिलिटीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सेकंडरी इनफर्टिलिटीवर उपचार करताना, यामागची खरी कारणं शोधणं खूप महत्त्वाचं असतं. योग्य मेडिकल टेस्ट्स, जीवनशैलीत बदल, वजन, आहार आणि आरोग्याची काळजी या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा गर्भधारणेची शक्यता लक्षणीय प्रमाणात वाढू शकते.

प्रायमरी आणि सेकंडरी इनफर्टिलिटीची तपासणी कशी केली जाते

इनफर्टिलिटीचे मूळ कारण समजून घेणे आणि त्यावर उपचार करणे हीच ट्रीटमेंटची मूलभूत प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत दोन्ही पार्टनर्सची तपासणी केली जाते.

स्त्रियांसाठी

स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची तपासणी साधारणत: सविस्तर मेडिकल हिस्टरी आणि ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग पासून सुरू होते.

  • ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग: रोज सकाळचे शरीर तापमान नोंदवणे, ओव्ह्युलेशन प्रेडिक्टर किट्स वापरुन विशिष्ट दिवसांवर तपासण्या करून अंडोत्सर्ग होत आहे का हे पाहणे, किंवा संLH आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन टेस्ट्स करणे यामुळे दर महिन्याला अंडोत्सर्ग नियमितपणे होत आहे की नाही, हे कळते.
  • हार्मोन ब्लड टेस्ट्स: रक्तातील खालील प्रजनन हार्मोन्सची तपासणी केली जाते –
    • फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH)
    • ल्युटिनायझिंग हार्मोन (LH)
    • प्रोलॅक्टिन
    • थायरॉईड हार्मोन
    • इस्ट्राडायॉल
  • पेल्विक अल्ट्रासाऊंड: अंडाशय आणि गर्भाशय यांची स्थिती, त्यांचा आकार, रचना आणि त्यात गाठी, पुटकुळे इत्यादी काही विकृती आहेत का, हे पाहण्यासाठी ही तपासणी केली जाते.
  • हिस्टरोसाल्पिंगोग्राफी (HSG): ही एक एक्स-रे तपासणी आहे. यात गर्भाशयातील पोकळी सामान्य आहे का आणि दोन्ही फलोपियन नलिका उघड्या व व्यवस्थित आहेत का, हे पाहिले जाते.
  • अँटी म्युलेरियन हार्मोन तपासणी: या तपासणीत अँटी म्युलेरियन हार्मोन पातळी मोजली जाते. यावरून अंडाशयातील शिल्लक अंडाणूंचा साठा किती आहे (ओव्हेरियन रिजर्व), याचा अंदाज येतो आणि स्त्रीची पुढील काळातील गर्भधारणेची क्षमता समजायला मदत होते.

पुरुषांसाठी

  • अंडकोष तपासणी: अंडकोषांचा आकार, घट्टपणा, आणि शिरा सुजणे (व्हॅरिकोसील) आहे का, हे पाहण्यासाठी शारीरिक तपासणी केली जाते.
  • शारीरिक तपासणी: पूर्ण जननेंद्रिय भागाची तपासणी करून अंडकोष, त्वचा, शिरा इत्यादींमध्ये काही विकृती आहेत का, याचा आढावा घेतला जातो.
  • वीर्य तपासणी: या तपासणीत वीर्यामधील शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल, तसेच आकार आणि रचना पाहिली जातात आणि यावरून फलनक्षमतेचा अंदाज घेतला जातो.
  • हार्मोन ब्लड टेस्ट्स: रक्तातील मुख्य प्रजनन हार्मोन, जसे की टेस्टोस्टेरॉन, FSH, LH यांची तपासणी केली जाते ज्यांचा परिणाम शुक्राणूंच्या निर्मितीवर होतो.
  • अंडकोष भागाची (स्क्रोटल) अल्ट्रासाऊंड तपासणी: अंडकोष किंवा त्याच्या आसपासच्या भागात काही गाठ, सूज, शिरांचे विकार किंवा इतर रचनात्मक अडचणी आहेत का, हे तपासण्यासाठी ही तपासणी केली जाते.

प्रायमरी असो किंवा सेकंडरी इनफर्टिलिटी निदान हा दोन्ही जोडीदारांचा एकत्रित प्रवास असतो. सर्व तपासण्या पूर्ण होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात, पण यामुळे अचूक कारण समोर येते आणि त्यानुसार योग्य व परिणामकारक उपचारयोजना आखता येते.

कधी भेट घ्यावी फर्टिलिटी स्पेशालिस्टला

खालीलपैकी काही गोष्टी जाणवत असतील, तर फर्टिलिटी स्पेशालिस्टला भेटण्याचा विचार नक्की करा.

  • बाळासाठी प्रयत्न करूनही गर्भ न राहणे:

    जर तुम्ही 12 महिने नियमितपणे बाळासाठी प्रयत्न करत आहात आणि तरीही गर्भधारणा होत नसेल (किंवा स्त्रीचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि 6 महिने प्रयत्न करूनही परिणाम नसेल), तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ आलेली आहे.

  • अनियमित पाळी किंवा इतर आरोग्याच्या तक्रारी:

    मासिक पाळीचा सायकल नेहमीच बदलत असणे, पाळी उशिरा येणे किंवा खूपच कमी/जास्त येणे, थायरॉईडची समस्या, पीसीओएस (PCOS), किंवा वारंवार गर्भपातचा इतिहास - या सगळ्या गोष्टी फलनक्षमतेवर परिणाम करू शकतात. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

  • आधी गर्भधारणा झाली, पण आता पुन्हा गर्भ न राहणे:

    एकदा यशस्वी गर्भधारणा किंवा बाळंतपण झाल्यानंतर, पुढच्या वेळी बराच काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल, तर हे सेकंडरी इनफर्टिलिटीचे लक्षण असू शकते. अशा वेळी योग्य तपासण्या आणि उपचारांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन उपयुक्त ठरते.

लवकरात लवकर इनफर्टिलिटी तज्ञाला भेटल्यास कारण शोधणे आणि त्यावर योग्य उपचार सुरू करणे सोपे होते. त्यामुळे “काही काळ अजून थांबू” असे म्हणत वेळ दवडू नका.

हेही वाचा: इनफर्टिलिटीचे उपचार कोणते आहेत?

निष्कर्ष

प्रायमरी असो किंवा सेकंडरी इनफर्टिलिटी दोन्ही प्रकारचे वंध्यत्व आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. अनिश्चितता, मानसिक ताण आणि भावना यांच्यात सतत चढ उतार जाणवू शकतात. पण इनफर्टिलिटीचा प्रकार, त्यामागची कारणे आणि निदान कसं केलं जातं हे समजलं, की जोडप्यांना स्वतःसाठी योग्य पावलं उचलणं सोपं होतं. बर्याच वेळा प्रायमरी आणि सेकंडरी इनफर्टिलिटीवर मेडिकल ट्रीटमेंट, जीवनशैलीत बदल, वजन नियंत्रण, आहार आणि ताण व्यवस्थापन यांद्वारे चांगले परिणाम मिळू शकतात पण यासाठी वेळ आणि संयम गरजेचा असतो. योग्य वेळी निदान, एकमेकांबद्दलची समजूतदार भावना आणि अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यास, अनेक जोडप्यांना बाळ प्राप्त होण्याची शक्यता निश्चितच वाढते.

सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न

सेकंडरी इनफर्टिलिटी प्रायमरी इनफर्टिलिटीपेक्षा जास्त आढळते का?

 

काही अभ्यासांमध्ये सेकंडरी इनफर्टिलिटीचे प्रमाण अधिक दिसते, कारण अनेक जोडपी दुसऱ्या बाळाची योजना उशिरा करतात आणि वय, वजन, आजार इत्यादी घटक वाढतात. पण दोन्ही प्रकार गंभीर आहेत आणि दोन्हींसाठी तपासणी गरजेची असते.

जीवनशैलीतील बदलांमुळे वंध्यत्व सुधारू शकते का?

 

हो, काही प्रकरणांमध्ये वजन नियंत्रित ठेवणे, चांगला आहार, व्यायाम, ताण कमी करणे, धूम्रपान–मद्यपान टाळणे यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी इनफर्टिलिटी दोन्हीमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात.

प्रायमरी इनफर्टिलिटीचा उपचार कसा केला जातो?

 

उपचार नेहमी कारणानुसार ठरतात. अंडोत्सर्गासाठी औषधे, हार्मोन थेरपी, संसर्ग किंवा गाठींसाठी उपचार/ सर्जरि, तसेच आवश्यक असल्यास IUI किंवा IVF सारखे एडवांस्ड उपचार केले जाऊ शकतात.

वयाचा सेकंडरी इनफर्टिलिटीवर परिणाम होतो का?

 

हो, वय वाढल्यावर विशेषतः 35 वर्षांनंतर अंडाणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते, आणि पुरुषांमध्येही शुक्राणूंची गुणवत्ता घसरू शकते. त्यामुळे दुसऱ्या किंवा पुढील गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते.

सेकंडरी इनफर्टिलिटी असली तरी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकते का?

 

बर्याच जोडप्यांना योग्य तपासण्या, उपचार आणि जीवनशैलीतील बदलांनंतर नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊ शकते. मात्र प्रत्येक केस वेगळी असते, त्यामुळे तुमच्या परिस्थितीनुसार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात सुरक्षित आहे.

**Disclaimer: The information provided here serves as a general guide and does not constitute medical advice. We strongly advise consulting a certified fertility expert for professional assessment and personalized treatment recommendations.
© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer