High risk pregnancy म्हणजे काय? उच्च जोखमीच्या गर्भधारणेत कोणती काळजी घ्यावी?

Dr. Uday Kargar

Reviewed by Dr. Uday Kargar

Sr. Executive Director

MBBS

10+ Years

verify Symbol Expert Verified

This information has been reviewed and approved by an experienced fertility specialist at Indira IVF to provide accurate and up-to-date guidance for our readers.

Last updated: November 04, 2026

Overview

High Risk Pregnancy चे निदान झाले आहे म्हणून तुम्ही एकट्या नाहीत. भारताच्या National Family Health Survey-5 (NFHS-5) च्या secondary data वर आधारित एका अभ्यासात, सध्या गर्भवती असलेल्या एकूण 23,853 महिलांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासानुसार, भारतीय महिलांमध्ये हाय रिस्क प्रेग्नन्सीचं प्रमाण 49.4% होतं. यापैकी 33% महिलांमध्ये एकच जोखीम घटक होता, तर 16.4% महिलांमध्ये एकापेक्षा जास्त जोखीम घटक होते.त्यामुळे तुम्हाला हाय रिस्क प्रेग्नन्सी असल्याचं सांगितलं गेलं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या नाही आहात. प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते आणि प्रत्येक गर्भधारणेत थोडा तरी धोका असतोच, फक्त काहींमध्ये तो जास्त असतो. योग्य माहिती, नियमित तपासण्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक गुंतागुंती वेळेवर ओळखता आणि त्यावर योग्य उपचार करता येतात. 

High Risk Pregnancy म्हणजे काय?

आईला, बाळाला किंवा दोघांनाही गर्भावस्थेत, प्रसूतीच्या वेळी किंवा त्यानंतर आरोग्याच्या गुंतागुंतीचा धोका सामान्यपेक्षा जास्त असेल, तर त्याला High Risk Pregnancy म्हणजेच उच्च जोखमीची गर्भधारणा म्हणतात. वय, आधीपासून असलेले आजार, आनुवंशिक कारणे, मागील गर्भधारणेतील समस्या किंवा सध्याच्या गर्भधारणेतील काही कारणांमुळे हा धोका वाढू शकतो. मात्र, High Risk Pregnancy म्हणजे काहीतरी चुकीचे होणारच असे नाही. अशा वेळी फक्त अधिक तपासण्या आणि काळजीपूर्वक देखरेखीची गरज असू शकते.

High Risk Pregnancy ची व्याख्या

High-risk pregnancy म्हणजे अशी गर्भधारणा, ज्यामध्ये गर्भावस्थेत, प्रसूतीच्या वेळी किंवा प्रसूतीनंतर आईला, बाळाला किंवा दोघांनाही आरोग्याच्या गुंतागुंतीचा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा गर्भधारणेत डॉक्टरांकडून अधिक काळजीपूर्वक तपासणी आणि नियमित देखरेखीची गरज भासू शकते.

Normal pregnancy आणि high risk pregnancy मधील फरक

मुद्दासामान्य गर्भावस्थाउच्च जोखमीची गर्भावस्था
जोखीम घटकमोठे जोखीम घटक नसतात.एक किंवा अधिक कारणांमुळे गुंतागुंतीचा धोका वाढतो.
गर्भावस्थेतील काळजीनियमित तपासण्या पुरेशा असतात.वारंवार किंवा बारकाईने तपासणी करावी लागू शकते.
तपासण्या आणि स्कॅननेहमीच्या तपासण्या आणि स्कॅन केले जातात.गर्भधारणेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त रक्त तपासण्या,अल्ट्रासाऊंड, गर्भाची देखरेख किंवा विशेष चाचण्यांची शिफारस केली जाऊ शकते.
तज्ज्ञांचा सल्लासहसा नियमित स्त्रीरोगतज्ज्ञांकडून उपचार होतात.मॅटर्नल-फीटल मेडिसिन तज्ज्ञ किंवा गरजेनुसार इतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो.
बाळाचे आरोग्य व जन्मबाळाची वाढ सामान्यपणे होते आणि अकाली प्रसूतीचा धोका कमी असतो.अकाली प्रसूतीचा धोका जास्त असतो किंवा बाळाच्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीचा धोका अधिक असू शकतो.
प्रसूतीचे नियोजनप्रसूती साधारणपणे नेहमीच्या पद्धतीने नियोजित केली जाते.आई आणि बाळाच्या स्थितीनुसार प्रसूतीची पद्धत ठरवली जाते.

High Risk Pregnancy ची कारणे आणि Risk Factors कोणते?

उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणेमागे अनेक कारणे असतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  1. आईचे वय: 18 वर्षांपेक्षा कमी किंवा 25 वर्षांपेक्षा जास्त वयात गर्भधारणा झाल्यास काही समस्या होण्याची शक्यता वाढते. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि गुणसूत्रांशी संबंधित समस्या यांचा समावेश होतो. 
  2. शरीराचे वजन: लठ्ठपणामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. खूप कमी वजन असल्यास पोषणाची कमतरता आणि बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
  3. आधीपासून असलेले आजार: मधुमेह, HIV, उच्च रक्तदाब, थायरॉईडचे विकार, हृदय किंवा मूत्रपिंडाचे आजार, अपस्मार, गंभीर दमा आणि स्वयंप्रतिकाराचे आजार यांसारख्या समस्यांमध्ये अधिक देखरेख आवश्यक असू शकते.
  4. जीवनशैली: धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचा वापर, असंतुलित आहार, कमी शारीरिक हालचाल आणि सततचा ताण यांचा गर्भधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  5. दोन गर्भधारणांमधील अंतर: खूप कमी अंतर असल्यास शरीराला मागील गर्भधारणेतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे विशेषतः प्रीटर्म डिलिव्हरी होण्याचा धोका वाढू शकतो. 
  6. मागील गर्भधारणेचा इतिहास: वारंवार गर्भपात, मृत बाळाचा जन्म, प्रीटर्म डिलिव्हरी, प्रीक्लॅम्पसिया किंवा बाळाची कमी वाढ यांचा इतिहास असल्यास पुढील गर्भधारणेत अधिक निरीक्षण केले जाते.
  7. गर्भाशयाशी संबंधित समस्या: गर्भाशयातील फायब्रॉइड्स, गर्भाशयाच्या रचनेतील बदल, गर्भाशयाच्या मुखाची कमजोरी किंवा आधी झालेली गर्भाशयाची शस्त्रक्रिया गर्भधारणेवर परिणाम करू शकते.
  8. जुळी किंवा अधिक बाळांची गर्भधारणा: अशा गर्भधारणेत प्रीटर्म डिलिव्हरी, बाळांची कमी वाढ आणि इतर गुंतागुंतींचा धोका वाढू शकतो.
  9. गर्भावस्थेत निर्माण होणाऱ्या समस्या, संसर्ग आणि आनुवंशिक कारणे: गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब, प्रीक्लॅम्पसिया, काही गंभीर संसर्ग किंवा कुटुंबातील आनुवंशिक आजारांचा इतिहास यामुळे अधिक तपासणी आणि देखरेखीची गरज लागू शकते.
  10. मानसिक आरोग्य: गर्भावस्थेतील तीव्र चिंता, नैराश्य किंवा मानसिक आघात याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

     

उच्च जोखमीचे घटक, त्यांची वेळीच ओळख आणि वेळीच उपाययोजना हीच आहे उच्च जोखमीच्या गर्भावस्थेचे व्यवस्थापन करण्याची गुरुकिल्ली.  

- Dr. Vanashri Bahade

 

high-risk-pregnancy-causes-risk-factors-marathi

 

High Risk Pregnancy ची लक्षणे कोणती?

तुमच्या तपासण्या, रिपोर्ट्स आणि स्कॅन पाहून डॉक्टरांना high risk pregnancy complications आहेत का, याचा अंदाज घेता येतो. मात्र, गर्भावस्थेत वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास ती दुर्लक्ष न करता शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

  • योनीमार्गातून रक्तस्राव किंवा पाण्यासारखा द्रव जाणे.
  • पोटात किंवा ओटीपोटात तीव्र किंवा सतत वेदना होणे.
  • बाळाची हालचाल नेहमीपेक्षा कमी होणे किंवा जाणवणे बंद होणे.
  • तीव्र किंवा सतत डोकेदुखी, विशेषतः त्यासोबत अंधुक दिसणे किंवा डोळ्यांसमोर ठिपके दिसणे.
  • चेहरा, हात किंवा पाय अचानक खूप सुजणे.
  • श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे किंवा हृदयाची धडधड वाढणे.
  • जास्त उलट्या होऊन पाणी किंवा अन्न पोटात न राहणे.
  • ताप, थंडी वाजणे किंवा खूप अशक्त वाटणे.
  • लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे.
  • चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे.
  • मन खूप उदास राहणे, तीव्र चिंता वाटणे किंवा स्वतःला इजा करण्याचे विचार येणे.

High Risk Pregnancy मुळे कोणत्या गुंतागुंती होऊ शकतात?

High risk pregnancy complications प्रत्येक महिलेमध्ये सारख्या असतीलच असे नाही. गर्भधारणेचे कारण, आईचे आरोग्य आणि बाळाची स्थिती यानुसार गुंतागुंत बदलू शकते. 

1. आईच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम

  • प्रीक्लॅम्पसिया: गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनंतर रक्तदाब वाढणे आणि त्याचा यकृत, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांवर परिणाम होणे ही प्रीक्लॅम्पसियाची लक्षणे आहेत. 
  • गर्भावस्थेतील मधुमेह: रक्तातील साखर वाढल्याने आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
  • जास्त रक्तस्राव: प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर जास्त रक्तस्राव होऊ शकतो.
  • गंभीर प्रीक्लॅम्पसियामध्ये झटके येणे (Eclampsia): ही गंभीर स्थिती असून तातडीच्या उपचारांची गरज असते.

2. बाळाच्या वाढीवर आणि आरोग्यावर होणारे परिणाम 

  • Intrauterine Growth Restriction (IUGR): गर्भाशयात बाळाची वाढ अपेक्षेप्रमाणे न होणे. 
  • कमी वजनाचे बाळ: जन्माच्या वेळी बाळाचे वजन अपेक्षेपेक्षा कमी असू शकते.
  • जन्मजात विकार: काही गर्भधारणांमध्ये बाळाच्या अवयवांच्या विकासाशी संबंधित समस्या आढळू शकतात.
  • बाळाला जन्मानंतर विशेष काळजीची गरज: काही परिस्थितींमध्ये बाळाला जन्मानंतर NICU मध्ये ठेवावे लागू शकते.

3. Preterm birth आणि इतर pregnancy complications 

  • Preterm birth: गर्भधारणेचे 37 आठवडे पूर्ण होण्यापूर्वी बाळाचा जन्म होणे. अशा बाळांना श्वास घेण्यास, वजन वाढण्यास किंवा इतर आरोग्याच्या समस्यांसाठी विशेष काळजी लागू शकते.
  • Placenta previa:प्लेसेंटा गर्भाशयाच्या खालच्या भागात चिकटतो आणि मुखाजवळ किंवा त्यावर येणे, ज्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो आणि प्रसूतीच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो.
  • Pregnancy loss: काही high-risk pregnancy मध्ये गर्भपात किंवा मृत बाळाचा जन्महोण्याचा धोका वाढू शकतो.

 

High Risk Pregnancy चे Diagnosis आणि Monitoring कसे केले जाते?

नॉर्मल असो किंवा high-risk pregnancy, नियमित तपासणी आवश्यक असते. मात्र, high-risk pregnancy मध्ये धोक्याच्या कारणानुसार आई आणि बाळाच्या आरोग्यावर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाऊ शकते.

  1. Regular prenatal check-ups: प्रत्येक भेटीत डॉक्टर आईचे वजन, रक्तदाब, तब्येत आणि गर्भावस्थेतील लक्षणे तपासतात. गरजेनुसार तपासण्यांची वारंवारता वाढवली जाऊ शकते.
  2. Blood tests आणि ultrasound: हिमोग्लोबिन, रक्तगट, Rh घटक, संसर्ग आणि रक्तातील साखर यांसारख्या गोष्टी तपासल्या जातात. अल्ट्रासाऊंडमधून बाळाची वाढ, गर्भाचे वय, बाळांची संख्या आणि प्लेसेंटाची स्थिती पाहता येते.
  3. Blood pressure आणि blood sugar monitoring: रक्तदाब नियमित तपासल्याने उच्च रक्तदाब आणि प्रीक्लॅम्पसिया यांसारख्या समस्या लवकर लक्षात येऊ शकतात. गर्भावस्थेतील मधुमेहासाठी साधारणपणे 24 ते 28 आठवड्यांदरम्यान रक्तातील साखरेची तपासणी केली जाते.
  4. बाळाच्या growth आणि health चे निरीक्षण: बाळाची वाढ, हृदयाचे ठोके आणि हालचाली तपासल्या जातात. गरजेनुसार डॉप्लर अल्ट्रासाऊंड, एनएसटी किंवा बीपीपी यांसारख्या तपासण्या केल्या जाऊ शकतात.
high-risk-pregnancy-diagnosis-monitoring-marathi.jpg

High Risk Pregnancy मध्ये कोणती काळजी घ्यावी?

गर्भधारणा होण्यापूर्वीच काही आरोग्य समस्या असल्याचे माहीत असेल किंवा गर्भधारणेनंतर ती समस्या समोर आली असेल, तरी योग्य काळजी आणि नियमित डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. काही जोखीम घटक टाळता येत नाहीत, पण योग्य काळजीमुळे अनेक गुंतागुंती लवकर ओळखता आणि नियंत्रित करता येऊ शकतात.

  • मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड किंवा इतर आजार असल्यास गर्भधारणेपूर्वी त्यांचे योग्य नियंत्रण आहे का, हे डॉक्टरांकडून तपासून घ्या.
  • नियमित तपासण्या चुकवू नका. 
  • औषधे स्वतःहून घेऊ नका. 
  • पौष्टिक आहार घ्या. 
  • धूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थ टाळा. 
  • कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस आणि अपाश्चरित दुग्धजन्य पदार्थ टाळा. 
  • कॅफिनचे सेवनही मर्यादित ठेवा.
  • पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. 
  • जड किंवा अतिश्रमाचे व्यायाम टाळा.
  • धोक्याची लक्षणे दुर्लक्षित करू नका

High Risk Pregnancy मध्ये उपचार कसे केले जातात?

High-risk pregnancy treatment हे गर्भधारणेचे कारण आणि आई-बाळाच्या स्थितीनुसार ठरवले जाते.

  • मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा थायरॉईडसारखा आजार असल्यास तो नियंत्रणात ठेवण्यासाठी उपचार केले जातात.
  • गरजेनुसार डॉक्टर औषधे किंवा पूरक आहार देऊ शकतात.
  • आहार, विश्रांती आणि सुरक्षित शारीरिक हालचालींबाबत योग्य सल्ला दिला जातो.
  • आई किंवा बाळाच्या स्थितीनुसार अधिक तपासण्या आणि जवळून निरीक्षण केले जाते.
  • गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करून सतत देखरेख केली जाऊ शकते.
  • बाळाची आणि आईची स्थिती पाहून प्रसूतीची वेळ व पद्धत ठरवली जाते. काही वेळा वेळेआधी प्रसूती करावी लागू शकते. गरज असल्यास NICUची सुविधा असलेले रुग्णालय निवडले जाते.
  • प्रसूतीनंतरही काही काळ आईच्या रक्तदाबावर आणि रक्तस्रावासारख्या समस्यांवर लक्ष ठेवावे लागू शकते.

High Risk Pregnancy मध्ये तातडीने डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा?

गर्भावस्थेत प्रत्येक छोट्या त्रासाने घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे विनाकारण चिंता वाढू शकते. मात्र, खालील लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांशी संपर्क साधा: 

  • योनीमार्गातून रक्तस्राव होणे किंवा पाण्यासारखा द्रव जाणे
  • पोटात किंवा ओटीपोटात तीव्र वेदना होणे किंवा वेळेआधी नियमित कळा सुरू होणे
  • बाळाच्या हालचाली कमी होणे किंवा जाणवणे बंद होणे
  • तीव्र डोकेदुखी, अंधुक दिसणे किंवा चेहरा-हात-पाय अचानक जास्त सुजणे
  • श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखणे
  • सतत उलट्या होणे, खूप चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे
  • ताप, थंडी वाजणे किंवा लघवी करताना तीव्र जळजळ होणे

High Risk Pregnancy बद्दल सामान्य गैरसमज

गैरसमज 1: High-risk pregnancy म्हणजे काय तरनक्कीच High-risk complications.

सत्य: योग्य काळजी आणि नियमित तपासण्यांमुळे अनेक महिलांची high-risk pregnancy व्यवस्थित पार पडते आणि बाळही निरोगी जन्माला येते.

गैरसमज 2: High-risk pregnancy मध्ये पूर्ण वेळ बेडरेस्ट करावा लागतो.

सत्य: डॉक्टरांनी सांगितल्यासच बेडरेस्ट आवश्यक असतो. अन्यथा, योग्य विश्रांतीसोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित हालचाल करता येते.

गैरसमज 3: फक्त जास्त वयाच्या महिलांची High-risk pregnancy असते.

सत्य: कोणत्याही वयात high-risk pregnancy होऊ शकते. आरोग्याच्या समस्या, जुळी बाळे किंवा मागील गर्भधारणेतील गुंतागुंत यामुळेही धोका वाढू शकतो.

गैरसमज 4: High-risk pregnancy म्हणजे बाळ निरोगी असणार नाही.

सत्य: नियमित तपासणी, योग्य काळजी आणि गरजेनुसार वेळेवर उपचार घेतल्यास निरोगी बाळ होण्याची शक्यता चांगली असते.

निष्कर्ष

High-risk pregnancy in marathi म्हणजे घाबरण्याचे कारण नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की आई किंवा बाळाला काही गुंतागुंतींचा धोका सामान्यपेक्षा जास्त असू शकतो आणि त्यामुळे अधिक तपासण्या, देखरेख आणि काळजीची गरज भासू शकते. योग्य नियोजन, वेळेवर प्रसूतीपूर्व तपासण्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अनेक high-risk pregnancies व्यवस्थित पार पडतात. प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते, त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. माहिती आणि योग्य काळजी तुम्हाला पुढील टप्प्यांसाठी तयार ठेवते. त्यामुळे भीतीपेक्षा जागरूक राहा आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या व काळजी नियमितपणे घ्या. 

References

  1. Kuppusamy P, Prusty RK, Kale DP. High-risk pregnancy in India: prevalence and contributing risk factors – a national survey-based analysis. J Glob Health. 2023;13:04116. doi:10.7189/jogh.13.04116. Available from:https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/37712385/

Frequently Asked Questions

High risk pregnancy म्हणजे काय?

High risk pregnancy कशामुळे होते?

High risk pregnancy ची लक्षणे कोणती आहेत?

High risk pregnancy मध्ये कोणत्या तपासण्या केल्या जातात?

High risk pregnancy मध्ये कोणती काळजी घ्यावी?

High risk pregnancy मध्ये normal delivery होऊ शकते का?

High risk pregnancy मध्ये C-section आवश्यक असतो का?

High risk pregnancy असल्यास डॉक्टरांना किती वेळा भेटावे?

© 2026 Indira IVF Hospital Limited. All Rights Reserved. T&C Apply | Privacy Policy| *Disclaimer