Overview
तुम्ही विचार करत आहात ते अगदी बरोबर आहे. फोरसेप्स डिलिव्हरीमध्ये बाळाला बाहेर काढण्यासाठी खरंच धातूचं, चमच्यासारखं दिसणारं एक उपकरण वापरलं जातं. ही पद्धत सामान्य प्रसूती किंवा सिझेरियनपेक्षा वेगळी आहे, आणि बाळाला योनीमार्गातून सुरक्षितपणे बाहेर येण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रसूती कळा सुरू असतानाही बाळ अडकल्यासारखं वाटत असेल, आईला खूप थकवा आल्यामुळे पुढे जोर लावणं कठीण होत असेल, किंवा बाळाच्या हृदयाचे ठोके अचानक कमी-जास्त होत असतील, अशा वेळी डॉक्टर फोरसेप्स वापरण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रसूतीची कोणतीही पद्धत असो- नॉर्मल, सिझेरियन किंवा फोरसेप्स डिलिव्हरीही सगळी आई आणि बाळ दोघांच्याही सुरक्षिततेचा विचार करूनच ठरवली जाते. कारण प्रसूती नेहमी ठरल्याप्रमाणे होतेच असं नाही, आणि कधीकधी अचानक काही गुंतागुंत निर्माण झाली, तर डॉक्टरांना त्यानुसार निर्णय बदलावा लागतो.
Forceps delivery हा असिस्टेड व्हॅजायनल डिलिव्हरीचा एक प्रकार आहे. म्हणजेच बाळाचा जन्म योनीमार्गातूनच होतो, मात्र प्रसूती पूर्ण करण्यासाठी डॉक्टर फोर्सेप्स या विशेष वैद्यकीय उपकरणाची मदत घेतात. या पद्धतीमध्ये forceps नावाच्या विशेष वैद्यकीय उपकरणाचा वापर केला जातो. हे उपकरण आकाराने मोठ्या चमच्यांसारखे किंवा चिमट्यासारखे दिसते. प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यात बाळ जन्ममार्गातून बाहेर येण्यास अडचण होत असेल, तर डॉक्टर या उपकरणाच्या मदतीने बाळाचे डोके योग्य दिशेने बाहेर येण्यासाठी नियंत्रित पद्धतीने मदत करतात.
या परिस्थितीत फोर्सेप्सचा वापर केला जाऊ शकतो:
बाळाचा जन्म शक्य तितक्या लवकर करणे आवश्यक आहे, पण त्या क्षणी सिझेरियन पेक्षा फोर्सेप्सने योनीमार्गे प्रसूती पूर्ण करणे योग्य ठरेल, असे डॉक्टरांना वाटत असेल.

फोर्सेप्स सुरक्षितपणे वापरता येण्यासाठी काही वैद्यकीय अटी पूर्ण असणे आवश्यक असते.
गर्भाशयाचं तोंड (सर्व्हिक्स) पूर्णपणे उघडलेलं असणं गरजेचं आहे. सर्व्हिक्स पूर्ण उघडलेलं नसताना फोरसेप्स वापरल्यास बाळाला आणि आईला इजा होण्याचा धोका वाढतो.
फोर्सेप्स बाळाच्या डोक्यावर योग्य ठिकाणी ठेवता येतील आणि ते सुरक्षितपणे बाहेर आणता येईल अशी बाळाची स्थिती असणे महत्त्वाचे असते. बाळाचे डोके जन्ममार्गात किती खाली आले आहे आणि त्याची दिशा योग्य आहे का, हे डॉक्टर तपासतात. डोकं खूप वर असेल, तर फोरसेप्स वापरणं योग्य ठरत नाही.
फोरसेप्स वापरण्याआधी डॉक्टर बाळाचं नेमकं डोकं कोणत्या दिशेने आहे, ते तपासतात. तसंच गर्भावस्थेचा कालावधी आणि बाळाचं अंदाजे वजन पाहूनच फोरसेप्स वापरायचे की नाही, हे ठरवलं जातं कारण खूप आधीच्या आठवड्यांत किंवा वजन खूप जास्त असल्यास ही पद्धत योग्य ठरत नाही.
आईची प्रकृती, बाळाचे हृदयाचे ठोके, प्रसूतीची प्रगती आणि योनीमार्गे प्रसूती सुरक्षितपणे पूर्ण होण्याची शक्यता या सर्व गोष्टी डॉक्टर तपासतात. परिस्थिती सुरक्षित नसेल किंवा फोर्सेप्सने प्रसूती पूर्ण होण्याची शक्यता कमी असेल, तर सिझेरियनसारखा दुसरा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो.

फोर्सेप्स डिलिव्हरी करण्यापूर्वी डॉक्टर आई आणि बाळाची स्थिती तपासतात. साधारणपणे ही प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते.
सर्वप्रथम सर्विक्स पूर्णपणे उघडले आहे का, बाळाचे डोके जन्ममार्गात योग्य ठिकाणी आले आहे का आणि बाळाची दिशा योग्य आहे का, हे तपासले जाते. बाळाचे हृदयाचे ठोकेही पाहिले जातात, जेणेकरून त्याची स्थिती स्थिर आहे का हे समजू शकेल. त्यासोबतच आईची प्रकृती, प्रसूतीची प्रगती आणि योनीमार्गे प्रसूती सुरक्षितपणे पूर्ण करता येईल का, याचेही मूल्यांकन केले जाते. त्यानंतर आईचे मूत्राशय रिकामे करून आवश्यकतेनुसार भूल दिली जाते
आई आणि बाळाची स्थिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर फोर्सेप्स बाळाच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना काळजीपूर्वक बसवले जातात. प्रसूतीची कळ आल्यावर आईला जोर देण्यास सांगितले जाते आणि त्याच वेळी डॉक्टर नियंत्रित पद्धतीने फोर्सेप्सच्या मदतीने बाळाचे डोके बाहेर येण्यास मदत करतात. डोके बाहेर आल्यानंतर फोर्सेप्स काढून बाळाचा उर्वरित जन्म नेहमीच्या पद्धतीने होतो.
बाळ जन्मल्यानंतर त्याचा श्वास, हृदयाचे ठोके, हालचाल आणि एकूण स्थिती तपासली जाते. फोर्सेप्सच्या वापरामुळे बाळाच्या डोक्यावर सूज, त्वचेवर खुणा किंवा इतर काही जखम झाली आहे का, हेही पाहिले जाते. त्याच वेळी आईमध्ये योनीमार्ग, सर्विक्स किंवा पेरिनियमच्या भागात फाटणे आणि जास्त रक्तस्राव झाला आहे का, याची तपासणी केली जाते. गरज असल्यास जखमेवर टाके घातले जातात आणि काही काळ आई व बाळाला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले जाते.
फोरसेप्स डिलिव्हरी ही आवश्यकता असेल तेव्हाच वापरली जाणारी पद्धत आहे, आणि योग्य वेळी वापरल्यास याचे काही महत्त्वाचे फायदे होऊ शकतात.
फोरसेप्स डिलिव्हरी सुरक्षितपणे करण्यासाठी डॉक्टर पूर्ण काळजी घेतात, तरीही इतर कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेप्रमाणे यातही काही धोके असू शकतात.
आईला होणारे संभाव्य धोके
बाळाला होणारे संभाव्य धोके
Forceps delivery recovery ही प्रत्येक महिलेची वेगळी असू शकते. साधारणपणे योनीमार्गे प्रसूतीनंतरचीच काळजी घ्यावी लागते; मात्र एपिसिओटॉमी, टाके किंवा पेरिनियमला जास्त फाटणे झाले असेल, तर पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो.
एपिसिओटॉमी किंवा फाटलेल्या भागाला टाके घातले असल्यास ते साधारणपणे विरघळणारे असतात. हा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे, सॅनिटरी पॅड नियमित बदलणे आणि शौचालयानंतर योग्य स्वच्छता करणे महत्त्वाचं असतं. कोमट पाण्याने सिट्झ बाथ घेतल्यासही आराम मिळू शकतो. अशा जखमा बऱ्या होण्यासाठी साधारण काही आठवडे लागू शकतात.
सुरुवातीला शरीराला पुरेशी विश्रांती देणं गरजेचं आहे, आणि जास्त शारीरिक श्रम किंवा जड वस्तू उचलणं टाळावं. प्रकृती सुधारत गेल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू नेहमीच्या हालचाली सुरू करता येतात. पेरिनियमला मोठी दुखापत झाली असल्यास, पुढील तपासणी आणि पेल्विक फ्लोअर व्यायामांची गरज लागू शकते.
प्रसूतीनंतर योनीमार्गातून रक्तस्राव होणं सामान्य आहे. फोरसेप्स डिलिव्हरीनंतर सुरुवातीला हा रक्तस्राव थोडा जास्त असू शकतो, पण पुढील दिवसांत तो हळूहळू कमी होणं अपेक्षित असतं. डॉक्टरांनी सांगितलेली वेदनाशामक औषधं घेता येतात. मात्र पोटात किंवा टाक्यांच्या भागात वेदना वाढत असतील, दुर्गंधीयुक्त स्त्राव, जास्त सूज किंवा ताप येत असेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
सुरुवातीला लघवी करताना त्रास होऊ शकतो; काही वेळा थोड्या काळासाठी कॅथेटरची गरज लागू शकते. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी फायबरयुक्त आहार आणि पुरेसं पाणी घ्यावं, जेणेकरून शौचाच्या वेळी टाक्यांवर दाब येणार नाही.
| मुद्दा | Forceps delivery | C-section |
|---|---|---|
| प्रसूतीची पद्धत | योनीमार्गातून, फोरसेप्सच्या मदतीने | पोटावर आणि गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून |
| कधी केली जाते? | प्रसूतीचा शेवटचा टप्पा अडल्यास, आईला जोर देता येत नसल्यास, बाळाचं डोकं योग्य ठिकाणी असल्यास | योनीमार्गे प्रसूती सुरक्षित नसल्यास, बाळाची पोझिशन चुकीची असल्यास |
| शस्त्रक्रिया | पोटावर शस्त्रक्रिया होत नाही | पोटावर आणि गर्भाशयावर चीरा द्यावा लागतो |
| प्रसूतीची वेळ | गरज पडल्यावरच ठरवली जाते | नियोजित किंवा आपत्कालीन दोन्ही प्रकारे होऊ शकते |
| रिकव्हरी | सहसा लवकर; टाके असल्यास थोडा वेळ लागतो | जास्त वेळ लागतो, कारण मोठी शस्त्रक्रिया असते |
| संभाव्य गुंतागुंत | पेरिनियम फाटणे, एपिसिओटॉमी, सूज | संसर्ग, जास्त रक्तस्राव, रक्ताच्या गाठी |
गैरसमज 1: फोरसेप्स डिलिव्हरी हवी तेव्हा, कुठेही वापरता येते.
तथ्य: सर्व्हिक्स पूर्ण उघडलेलं असणं, बाळाचं डोकं योग्य पोझिशनमध्ये असणं यांसारख्या काही ठराविक अटी पूर्ण झाल्यावरच डॉक्टर फोरसेप्स वापरण्याचा निर्णय घेतात.
गैरसमज 2: फोर्सेप्सने बाळाला जोराने ओढून बाहेर काढले जाते.
तथ्य: forceps assisted delivery मध्ये बाळाला जोराने खेचले जात नाही. आईच्या जोरासोबत नियंत्रित पद्धतीने बाळाचे डोके जन्ममार्गातून बाहेर येण्यास मदत केली जाते.
गैरसमज 3: forceps delivery म्हणजे प्रसूतीत गंभीर समस्या झाली आहे.
तथ्य: बाळ लवकर बाहेर काढण्याची गरज, प्रसूती पुढे न सरकणे किंवा आईला प्रभावीपणे जोर देता न येणे अशा विविध परिस्थितीत फोर्सेप्सचा वापर केला जाऊ शकतो.
गैरसमज 4: फोरसेप्स डिलिव्हरीनंतर स्त्री पुन्हा कधीच नॉर्मल डिलिव्हरी करू शकत नाही.
तथ्य: फोरसेप्स डिलिव्हरी झाली असली, तरी पुढील गर्भधारणेत नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता पूर्णपणे असते; हे प्रत्येक वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.
गैरसमज 5: forceps delivery vs C-section मध्ये नेहमी सिझेरियन हाच सुरक्षित पर्याय असतो.
तथ्य: दोन्ही पद्धतींचे फायदे आणि धोके वेगळे असतात. बाळाची पोझिशन, प्रसूतीची अवस्था आणि आई-बाळाची स्थिती पाहून डॉक्टर योग्य पर्याय ठरवतात.
गैरसमज 6: फोरसेप्स वापरल्यामुळे बाळाला नेहमीच गंभीर इजा होते.
तथ्य: बहुतेक वेळा फोरसेप्समुळे फक्त चेहऱ्यावर तात्पुरत्या सूज किंवा खुणा येतात, ज्या काही दिवसांत आपोआप बऱ्या होतात. गंभीर इजा होण्याचं प्रमाण खूप कमी असतं.