Overview
गर्भधारणेची पहिली तिमाही हा गर्भाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अतिशय महत्त्वाचा काळ असतो. या काळात योनीमार्गातून रक्तस्राव होणे ही तुलनेने सामान्य बाब असून, वैद्यकीयदृष्ट्या ओळखल्या गेलेल्या सुमारे 15 ते 25% गर्भधारणांमध्ये तो दिसून येतो. हा रक्तस्राव अगदी हलक्या डागांपासून ते तुलनेने जास्त प्रमाणातील रक्तस्रावापर्यंत असू शकतो. काही वेळा सुरुवातीच्या गर्भावस्थेतील रक्तस्राव गंभीर कारण नसतानाही होऊ शकतो आणि गर्भधारणा पुढे व्यवस्थित सुरू राहू शकते. मात्र काही प्रकरणांमध्ये फायब्रॉइड्स, संसर्ग, एक्टोपिक गर्भधारणा किंवा गर्भपाताचा धोका यांसारख्या समस्यांमुळेही रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत रक्तस्राव दिसल्यास तो दुर्लक्षित न करता त्यामागचे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात (साधारणपणे पहिल्या तिमाहीत, पण 20 आठवड्यांआधी कधीही) योनीमार्गातून थोडा रक्तस्राव होणे आणि सोबत पोटात हलकं दुखणे किंवा क्रॅम्प्स येणे, याला थ्रेटन्ड ॲबॉर्शन म्हणतात.Threatened abortion in Marathi मध्ये याला सोप्या भाषेत “गर्भपाताचा धोका असलेली अवस्था” असे म्हणता येईल. या स्थितीत गर्भाशयाचं तोंड (सर्व्हिक्स) अजूनही बंद असतं आणि बाळाची (गर्भाची) वाढ सुरळीत सुरू असते. यालाच threatened miscarriage किंवा threatened early pregnancy loss असेही म्हटले जाते. डॉक्टर अल्ट्रासाऊंड आणि इतर तपासण्यांद्वारे गर्भधारणेचा नेमका टप्पा पाहून पुढील तपासणी ठरवतात. ही स्थिती अनुभवणं खूप भीतीदायक वाटू शकतं, पण हे लक्षात ठेवा रक्तस्राव होण्यामागे इतरही अनेक सौम्य कारणं असू शकतात, आणि बऱ्याच वेळा गर्भधारणा पुढे सुरळीत चालू राहते.

रक्ताचे काही थेंब, मनात हजारो प्रश्न..पण या गर्भाचा भविष्य नेमकं काय?
- Dr. Snehal Jainesh Doctor
गर्भावस्थेत रक्तस्राव होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक early pregnancy bleeding ला threatened abortion समजणे योग्य नाही.
गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीला फलित अंडे गर्भाशयाच्या आतील आवरणाला चिकटताना हलका रक्तस्राव किंवा स्पॉटिंग होऊ शकते. हा रक्तस्राव साधारणपणे कमी प्रमाणात असतो.
गर्भावस्थेत सर्विक्समध्ये रक्तपुरवठा वाढतो आणि ते अधिक संवेदनशील होते. त्यामुळे लैंगिक संबंध किंवा काही वैद्यकीय तपासणीनंतर हलका रक्तस्राव होऊ शकतो. योनी किंवा सर्विक्सला झालेली जखम, सूज किंवा झीज, पॉलिप, फायब्रॉइड, सर्विक्समधील असामान्य पेशींचे बदल किंवा गाठ यांमुळेही रक्तस्राव होऊ शकतो.
संसर्गामुळे सर्विक्स किंवा योनीतील भाग अधिक नाजूक झाल्यास स्पर्शानेही रक्तस्राव होऊ शकतो. याशिवाय सबकोरियोनिक रक्तस्राव, हार्मोनल बदल, जुळ्या किंवा एकापेक्षा जास्त बाळांची गर्भधारणा असल्यास , गर्भपात, गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा किंवा इतर गर्भावस्थेशी संबंधित समस्या हे देखील संभाव्य कारणे आहेत.
Threatened abortion symptoms मध्ये प्रामुख्याने योनीतून रक्तस्राव किंवा स्पॉटिंग दिसते. रक्ताचा रंग गुलाबी, तपकिरी किंवा लाल असू शकतो. काही महिलांना खालच्या पोटात सौम्य कळा किंवा दुखणे जाणवू शकते. Threatened abortion bleeding कमी प्रमाणात आणि अधूनमधून होऊ शकते. मात्र रक्तस्राव वाढत असेल, रक्ताच्या गुठळ्या किंवा टिश्यू बाहेर पडत असेल, पोटदुखी तीव्र होत असेल किंवा एकाच बाजूला जास्त दुखत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा.
Threatened abortion diagnosis करताना डॉक्टर रक्तस्रावाचे प्रमाण, गर्भावस्थेचा कालावधी आणि गर्भाची स्थिती तपासतात.
विशेषतः ट्रान्सव्हॅजायनल अल्ट्रासाऊंडद्वारे गर्भ गर्भाशयात योग्य ठिकाणी आहे का, गर्भाची वाढ कितपत झाली आहे आणि गर्भाची हृदयाची हालचाल दिसते का हे तपासले जाते. याशिवाय गर्भाशय, अंडाशय आणि आसपासच्या भागात रक्तस्राव किंवा इतर काही गुंतागुंत आहे का, हेही तपासता येते. गर्भावस्था खूप सुरुवातीची असल्यास काही दिवसांनी पुन्हा अल्ट्रासाऊंड करावा लागू शकतो.
रक्तातील गर्भधारणेशी संबंधित हार्मोन म्हणजे बीटा-hCG तपासला जाऊ शकतो. सुरुवातीच्या गर्भावस्थेत त्याची पातळी कशी बदलते हे पाहण्यासाठी काही वेळा दोन किंवा अधिक चाचण्या केल्या जातात. मात्र केवळ एचसीजीच्या एका अहवालावरून निदान केले जात नाही.
पेल्विक तपासणीद्वारे रक्तस्राव कुठून होत आहे, गर्भाशयाचे तोंड उघडले आहे की बंद आहे आणि संसर्गाची काही चिन्हे आहेत का हे पाहिले जाऊ शकते.
शेवटची मासिक पाळी कधी आली, रक्तस्राव किती आहे, पोटदुखी आहे का, रक्ताच्या गुठळ्या किंवा टिश्यू बाहेर पडला का, पूर्वी गर्भपात झाला आहे का आणि गर्भावस्था किती आठवड्यांची आहे, याची माहिती निदानासाठी महत्त्वाची असते.

बहुतेक वेळा थ्रेटन्ड ॲबॉर्शनमुळे गर्भधारणेला कोणतंही नुकसान होत नाही, अनेक महिलांची गर्भधारणा पुढे सुरळीत राहते आणि बाळ निरोगी जन्माला येतं. तरीही, रक्तस्राव न झालेल्या महिलांच्या तुलनेत यात काही धोके थोडे जास्त असू शकतात, जसं की
तातडीचे धोके
गर्भधारणेच्या पुढील टप्प्यातील आणि प्रसूतीशी संबंधित धोके
सुरुवातीचा रक्तस्राव होऊनही गर्भधारणा 20 आठवड्यांपुढे टिकली, तरी अभ्यासांनुसार अशी गर्भधारणा अधिक जोखमीची मानली जाते, आणि पुढील धोके वाढू शकतात:
Threatened abortion treatment हे प्रत्येक महिलेसाठी सारखे नसते. रक्तस्रावाचे कारण, गर्भावस्थेचा कालावधी, अल्ट्रासाऊंडमधील निष्कर्ष आणि पूर्वी गर्भपात झाला आहे का, यानुसार उपचार ठरवले जातात.
या काळात स्वतःची आणि गर्भधारणेची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. खाली काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत.
खालीलपैकी कोणतेही threatened abortion symptoms दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी:
PubMed Central. Research article on early pregnancy bleeding. Read the research article. : Source